छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः सिडको एन २ परिसरातील मेडिकल व्यवसायीकाचे घर फोडत चोरट्यांनी ६९ हजार ९१९ रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केले. ही घटना १८ जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल वसंत दाभाडे रा. सारा पार्क सिडको एन २ यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार १७ जानेवारी रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडत कपाटात ठेवलेले २१ हजार ४५९ रूपये किंमतीचा सोन्याचा वेढा, १६ हजार ३०२ रूपये किंमतीची सोन्याची अंगठी, १७ हजार १५८ रूपये किंमतीचे कानातले तसेच १५ हजार रूपये रोख असा ६९ हजार ९१९ रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी मुकूंदवाडी ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.














